पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक इयत्ता ५ वी व माध्यमिक इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेला राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झालेले असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

