ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत कुलकर्णी, सुमती जोशी, संग्राम गायकवाड यांना लोकमंगल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापूरच्या सुनिता ढागा यांना देखील साहित्य देऊन गौरविण्यात आले तर कौतिक राव ठाले – पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल बँकेच्या वतीने रविवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी साहित्यिक आसाराम लोमटे, आमदार सुभाष देशमुख, शोभ बोल्ली उपस्थित होते.