परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : उत्तर केरळ ते मराठवाडादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ईशान्येकडील वाऱ्यांमुळे मराठवाडा आणि विदर्भात 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी तुरळक पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटकात देखील आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात झाली आहे . मात्र आता राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर केरळ ते मराठवाडादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी देखील काही ठिकाणी सरींचा अंदाज आहे.