येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरात उद्या मराठा आरक्षणाकडे शासनाचे लक्ष वेधावे यासाठी नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे .रविवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून हा मोर्चा निघणार असून यामध्ये विविध पक्ष संघटना आणि समाज बांधव मोठ्या प्रमाणावर हजर राहणार आहेत. एकी कडे कोरोनाचे निर्बंध असताना हा मोर्चा काढू नये अशा नोटिसा पोलीस आयुक्तालयाने आंदोलनकर्त्यांना दिल्या आहेत मात्र नोटिसा दिल्या तरीही आम्ही मोर्चा काढणारच असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे उद्या सोलापुरात काय होणार याचे टेन्शन पोलीस खात्याला लागले आहे. सोलापूर शहरात आज आणि उद्या वीकेंड लोकडाऊन आहे. लॉक डाऊन ची अंमलबजावणी कड क होण्यासाठी आणि उद्याच्या मोर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी आजच चौकाचौकात विविध वाहने अडवून विचारपूस सुरु केली आहे. आज मात्र सोलापूर शहरातील सर्व प्रकारची दुकाने बंद असून हॉटेलमध्ये फक्त पार्सल सेवा सुरू आहे.