उत्तर सोलापूर (तालुका प्रतिनिधी) :- मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने दोन जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषण मागे घेतले तरीही गावोगावी साखळी उपोषण आंदोलन सुरुच ठेवण्याची सूचना त्यांनी दिली असून त्यानुसार वडाळा येथे दोन जानेवारीपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला असल्याची माहिती वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे यांनी दिली.
दरम्यान या आंदोलनाला सर्वंच जाती धर्मातील लोकांचा प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी (दि.३) मुस्लिम बांधव उपोषणाला बसले असल्याचे जितेंद्र साठे यांनी सांगितले.सरपंच जितेंद्र साठे, पापुलाल शेख,कचुर तांबोळी,उमेश पाटील ,साजिद शेख, अफसर शेख,इलाही खातिब,आरिफ बागवान, अन्वर बागवान, रफिक बेग,अझहर शेख, तोहिद शेख,ख्वाजा तांबोळी,शाहरुख बागवान,जैद बागवान, शकील शेख,आजमत शेख,रियाज खतिब, मुस्तफा शेख,सायर शेख,कैफ शेख,कृष्णात साठे इत्यादी उपोषणाला उपस्थित होते.
३७५ जणांचे मुंडण अन् मोफत सेवा
सरपंच जितेंद्र साठे यांनी मराठा आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तरुणांना मुंडण करण्यासाठी आवाहन केले.पहिल्यांदा त्यांनी मुंडण केले.गुरुवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत युवक आणि लहान मुले देखील मुंडण केले.रात्री उशिरापर्यंत ३७५ जणांनी मुंडण केले असून वडाळा गावातील सर्व सलून व्यवसायिकांनी सर्वांचे मोफत मुंडण करून या आंदोलनात मोठे योगदान दिले असल्याचे सरपंच साठे यांनी सांगितले.