अपर मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा पाणलोट साठी नियुक्ती
सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निवड श्रेणी या पदावर पदोन्नती मिळाली आहे. सध्या ते अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे या पदावर कार्यरत आहेत. ग्रामविकास विभागाने दि. २२ डिसेंबर २०२२ चा शासन निर्णया द्वारे ग्राम विकास विभागातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रकल्प संचालक या पदावर कार्यरत असणारे १२ अधिकारी यांना निवडश्रेणी देऊन पदोन्नती केली आहे. त्यानुसार त्यांना पदस्थापना दिली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदे मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी ठळक कामे केली. बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभागाचे निविदा प्रक्रिया गतिमान केली. पशू संजीवनी अभियान राबवले. महा आवास अभियान, उमेद अभियान ,राज्यात नावलौकिक झाला आहे. या विभागास १२ पुरस्कार मिळाले. कृषी विभाग, स्वावलंबन योजना प्रभावी पणे राबवली. सातारा येथे कार्यरत असताना त्यांनी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवले.त्याची दखल घेऊन त्याना पदाचे नाव अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी , वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य, पुणे या ठिकाणी नियुक्ती देणेत आली. या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.दांडगा जनसंपर्क व कार्यांची गती पाहून वंसुधरा अभियानाच्या राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांचे वर शासनाने दिली आहे.
सोलापूर जिल्ह्सात योजनेची व्याप्ती वाढविणार – अपर सिईओ संतोष धोत्रे
वसुंधरा पाणलोट अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात योजनेची व्याप्ती वाढविणेस मोठा वाव आहे. राज्यात योजनेला गती देणे बरोबर सोलापूर जिल्ह्यात विशेष लक्ष राहिल असेही वंसुधरा पाणलोट चे राज्याचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी सांगितले. सोलापूर चे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे सोलापूर जिल्ह्सात काम करत असताना चांगले सहकार्य मिळाले असल्याचे अपर सिईओ संतोष धोत्रे यांनी सांगितले.