सोलापूर – सलग दोन दिवस पडत्या पावसात जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारत असलेल्या शाळेची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केली. सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या मार्केडेंय नगर येथील जिल्हा परिषद इमारतींची पाहणी मंगळवारी तर बुधवारी मजरेवाडी व कुमठे येथील प्राथमिक शाळांची पाहणी जिल्हा परिषेदेच्या प्रशासक व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केली. कामात हालगर्जी पणा केले बद्दल प्रभारी मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस देणेत आली आहे.
यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रभारी शिक्षणाधिकारी मल्लिनाथ निंबर्गी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील १०० शाळा धोकादायक असल्याचे निदर्शनास आलेनंतर प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी मार्केडेंय नगर चे इमारतीची पाहणी मंगळवारी केली. शाळेची झालेली दुरावस्थेबद्दल त्यांनी तात्काळ मुलांची सुरक्षितता घेणे बाबत मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी यांना सुचना दिल्या. मुलांचा व शिक्षकांचा हजेरी रजिस्टर तपासून मुलांशी संवाद साधला. अंधुक उजेड असलेले शाळेच्या खोलीत सुर्यप्रकाशाच्या उजेडात त्यांनी पाहणी करून शिक्षकांकडून शाळेच्या अडचणी जाणून घेतल्या. शाळेच्या एकुण चार खोल्या असून दोन खोल्या धोकादायक आहेत. या शाळेचे स्ट्रक्चरल आॅडिट करणेत आले आहेत. यामध्ये ६० टक्के धोकादायक खोली असल्याचा अहवाल देणेत आला असल्याचे प्रभारी मुख्याध्यापक विठ्ठल यादव यांनी सांगितले.
शाळेच्या दुरावस्थेबद्दल सिईओ आव्हाळे यांनी चिंता व्यक्त केली. संवेदनशील असलेल्या सिईओ आव्हाळे यांनी पावसाची तमा न बाळगता महापालिकेच्या हद्दीत असलेल्या शाळांची पाहणी करून सुरक्षितेतच्या सुचना दिल्या.
मजरेवाडी व कुमठे शाळांची पाहणी
कुमठे येथीस धोकादायक इमारतीची पाहणी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केली. दरम्यान पाहणीस अती धोकादायक असलेल्या सहा शाळा खोलीतील मुलांना दुसरी कडे बसणेचे सुचना दिल्या. मजरेवाडी येथील अंगणवाडी ची खोली धोकादायक असलेने अंगणवाडी साठी सुरक्षित ठिकाणी बसविण्याच्या सुचना दिल्या. कुमठे येथे स्वत आहाराची तपासणी केली.
मजरेवाडी च्या प्रगती पाहून सिईओ समाधानी
मजरेवाडी येथील प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून संवाद साधला. शाळेची इमारत व शाळेचे सौंदर्यीकरण व परिसर स्वच्छता व विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून सिईओ मनिषा आव्हाळे यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गटविकास अधिकारी यांनी सक्त सुचना
मार्केडेय नगर येथीस धोकादायक असलेल्या शाळेच्या इमारतीची पाहणी केलेनंतर जिल्ह्यातील सर्व धोकादायक इमारतीची सद्यस्थिती पाठविण्याच्या सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी तात्काळ गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. धोकादायक इमारतीच्या ठिकाणी मुले बसणार नाहीत याची काळजी घेणेचे सुचना दिले आहेत.
सिईओ यांनी घेतला “खिचडी” चा आस्वाद..!
मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुलांना शालेय पोषण आहार अंतर्गत देणेत येणारे आहाराची पाहणी केली. धान्याची स्वच्छता, सुरक्षितता, दर्जा व गुणवत्तेची पाहणी करून खिचडी स्वत खाऊन पाहिली. तांदळा पासून बनविलेल्या खिचडी मध्ये तुरदाळ, कांदा, व भोपळ्यांचा समावेश करणेत आला होता. मसाले टाकून ही खिचडी बनविणेत आली होती. आहारात आणखी सुधारणा करणेचे सुचना दिल्या.