११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला, मध्य रेल्वेने आज, २०.०६.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे योगच्या फायद्यांवर एक चर्चासत्र आयोजित केले होते.
मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री प्रतीक गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मध्य रेल्वे मुख्यालय आणि त्याच्या सर्व विभागांमध्ये योगाशी संबंधित उपक्रमांचे नियोजन आणि आयोजन यावर चर्चा करण्यात आली.
या चर्चासत्राचा एक भाग म्हणून, मुंबईतील महिला पतंजली योग समितीच्या योग स्वयंसेवकांनी दिग्दर्शित केलेल्या योग सत्रात अतिरिक्त महाव्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचारी देखील सहभागी झाले होते.
११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मध्य रेल्वे २१ जून २०२५ रोजी विविध उपक्रम राबविण्यास सज्ज आहे.