बालामुनींच्या शतावधान कार्यक्रमास पावर आणि मनी पावर जाणणाऱ्या तरुण पिढीला बौद्धिक पावर काय असते याची माहिती बालमुनी नमी चंद्र सागर आणि नेहमीच चंद्रसागर म. सा. यांनी करून दिला.
जैन श्वेतांबर आदेश्वर भगवान मंदिर ट्रस्टच्या वतीने वर्धमान तपोनिधी आचार्य नयनचंद्र सागर जी म. सा. यांचे शिष्यत्तम महा शतावधानी अभिनंदनचंद्र सागर म. सा. के शिष्यरत्न बालमुनी नमी चंद्रसागर आणि नेमीचंद्रसागर म. सा. हे दोन्ही बालमुनी आपल्या बौद्धिक क्षमता दाखऊन दिले.
“शतावधान” हे शब्द संस्कृत शब्द आहे. शतावधान म्हणजे काय ? तर “शत” म्हणजे “शंभर” आणि “अवधान” म्हणजे “आठवण” ठेवणे आता वेगवेगळ्या लोकांकडून जर वेगवेगळे प्रश्न विचारले गेले तर त्याचे उत्तर ते लगेचच देतात. परंतु जर दहाव्या प्रश्नानंतर पुन्हा दुसरा प्रश्न जर कोणी विचारला की त्याचे उत्तर तुम्ही काय दिले होते. ते प्रश्न आणि उत्तर ते एकाच वेळी सांगतात. त्यांची बौद्धिक क्षमता ते लगेचच तिकडे दाखऊन दिले आहे.
एखादी वैज्ञानिक गोष्ट ही साधनांच्या माध्यमातून प्राप्त होते. परंतु अध्यात्मिक गोष्ट अशी आहे ती साधना करूनच त्याची सिद्धी प्राप्त होत असते. असे या बालमुनींचे मत आहे. “शतावधान” च्या माध्यमातून त्यांनी पावर, मसल्स पावर आणि मेन पावर या गोष्टी जाणून घेणाऱ्या समाजाला , त्यांनी बौद्धिक शक्ती काय असते आणि आपल्या आत्म्याची ताकद कशी असते ते बुद्धीच्या माध्यमातून समजून सांगणार आहेत. त्याचे हे जिवंत उदाहरण म्हणजे हे बालमुनी होय.
वरील कार्यक्रमाचा जैन समाजा बांधावा बरोबरच इतर समाज बांधवांनी देखील लाभ घेतला. सोलापुरात बहुचर्चित असा हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जैन श्वेतांबर आदेश्र्वर भगवान मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला. सर्व जैन समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.