सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ब्लड बँकेच्या वतीने जागतिक रक्तदानाची औचिते साधून शतक वीर रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर अधीक्षक तोडकर साहेब डॉक्टर सोनवणे विनायक कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.



प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शतक वीर रक्तदाते श्याम पाटील१०४ आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे १०८ अंबादास लोखंडे आदी शतक वीरांचा सन्मान करण्यात आला. डॉ. संजीव ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रक्तदान हे सर्वांनीच केले पाहिजे प्रत्येक घरात रक्तदाते तयार होणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात जास्तीत जास्त युवकांनी नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन केले.