दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे गावाजवळ शेडम येथून पुणे येथे जात असताना एका भरधाव सिमेंट बलकर क्रमांक KA 32 AA 2511 वरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर सिमेंट बलकर पलटी होऊन सदर चालक हा गाडीखाली अडकल्यामुळे डोक्यास, हातापायास गंभीर मार लागून जागीच ठार झाला.


सदर अपघातातील मृत तरुणास वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. महेश वावरे आणि रुग्णवाहिका चालक मगंध भोसले यांनी टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी बालाजी साळुंखे साहेब (PSI) आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव श्री.चंद्रकांत दुर्योधन माने वाय ३८ वर्षे रा. आष्टी. ता. मोहोळ, जि. सोलापूर, महाराष्ट्र असे असून या अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप साहेब आणि सरडे साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख अमर पाटील साहेब यांनी दिली आहे.