बार्शी | विश्वभूषण, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून सध्या पध्दतीने साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय बावणे तर प्रमुख पाहुणे मेजर रामचंद्र काळे हे होते. प्रमुख उपस्थिती मंगेश डोळसे होते.
महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेजर रामचंद्र माळी अध्यक्ष धनंजय बावणे यांच्या हस्ते घालण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांच्या हस्ते विविध मान्यवरांचे पुस्तक व गुलाब देऊन सत्कार करण्यात आले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाची प्रस्तावना महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी केले .तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किरण खुरंगळे यांनी मानले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, गणेश लंगोटे , मंगेश डोळसे , सुरज चौधरी , धनंजय बावणे , रामचंद्र माळी इतर मान्यवर संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.