सोलापूर : १२ नोव्हेंबर रोजी दीपक निकाळजे सामाजिक विकास संघटना व आस्था रोटी बँकेच्या वतीने सोलापूरातील समाजातील वंचित, बेघर, गरिब, अंध, अपंग भिक्षूंना शिवानुभव मंगल कार्यालयात अभ्यंग स्नान घालून दिवाळी साजरी करण्यात आली. याप्रसंगी १०० महिलांना साडी, फराळ व एकूण १०० भिक्षुंना दिवाळीचे टॉवेल बनियन ,टोपी शर्ट, व विजार, तेल ,साबण, उटण चिवडा, लाडू, फटाके देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ सोलापूर नूतन अध्यक्ष मल्लिनाथ गवसने लायन्स क्लब ऑफ सोलापूर माजी अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, श्रीशेल बनशेट्टी, आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष हर्षवर्धन शहा माजी पोलीस गजानन भरले, संघटनेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, सचिव सुहास छंचुरे, आस्था रोटी बँकेचे संचालक योगेश कुंदुर सिद्धू बेऊर, वेंदात तालिकोटी, पिंटु कस्तुरे , रौफ सय्यद,शुभम मंगळुरे महेश नागणसुरे, यांच्या उपस्थितीत सर्व भिक्षुंना तेल,साबण उटणे,गरम पाणी देऊन ओवाळणी करून अभ्यंग स्नान घालण्यात आले.
हा उपक्रम राबवण्यासाठी रौफभाई सय्यद, सुरज छ़ंचुरे, उदय छंचुरे,कामेव याळगी, प्रथमेश गावडे, योगीराज आरळीमार, अनिल कपाळे, अमित मिस्किन यांनी परिश्रम घेतले. आस्था रोटी बँकेचे सल्लागार, डॉ महावीर शास्त्री, अनिल जमगे, बसवराज मठपती, कामिनी गांधी, माया पाटील, पळसदेवकर यांचे देखील सहकार्य लाभले