सोलापूर : प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड कंपनीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. महिला दिनानिमित्त मेडिसिटी हॉस्पिटलच्या वतीने सर्व महिला कर्मचार्यांसाठी आरोग्य जागर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ‘चूज टू चेंज’ ही यंदाच्या जागतिक महिला दिनाची थीम होती. त्यास अनुसरून प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. युनिफॉर्मला सुटी देत सर्वांनी फोटोसेशन करीत स्नेहभोजनाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या.