येस न्युज नेटवर्क : CBSE 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे, लाखो विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून या निकालाची वाट पाहत होते. सर्व विद्यार्थी CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. या वेबसाइट्सवर विद्यार्थी आपला रोल नंबर टाकून सहज आपला निकाल तपासू शकतात. येथे तुमची संपूर्ण मार्कशीट दिसेल, खाली डाउनलोड पर्याय देखील दिसेल, जिथून तुम्ही तुमची मार्कशीट डाउनलोड करू शकता
दहावीचा निकालही लवकरच
सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत 21 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. CBSE लवकरच इयत्ता 10वी टर्म 2 परीक्षांचे देखील निकाल जाहीर करणार आहे. दोन्ही वर्गांचे निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर होतील अशी अपेक्षा होती. त्यापैकी बारावीचे निकाल आज जाहीर करण्यात आले आहेत.