सोलापूर : या पंधरा श्लोक भवानी पेठेतील नमकीन मिठाई फॅक्टरीच्या ऑफिसचे लोकर तोडून अज्ञात चोरट्याने दोन लाख 76 हजार रुपयांची चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांनी काऊंटरवर ठेवलेल्या काजू आणि वेफर्स वर ताव मारल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे . चोरट्यांनी पैसे चोरण्याबरोबरच काजू, वेफर्सची पाकीटे, साबुदाणा चिवडा , वेफर्स तसेच सुकामेव्याची पाकिटे घेऊन पलायन केल्याची फिर्याद नंदकिशोर श्रीनिवास तिवाडी यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात केली आहे.
शुक्रवारी पहाटे फॅक्टरीवर काम करणारा वॉचमन रजेवर असल्याची संधी साधत चोरट्यांनी गेटवरून फॅक्टरीमध्ये प्रवेश केला आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फॅक्टरीत प्रवेश केला ऑफिसमधील केबिनचे लॉक तोडून ड्रॉव्हरमधील रोख रक्कम या चोरट्याने पळविली आहे. ही चोरी शुक्रवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नमकीन फॅक्टरी मधील सीसीटीव्हीमध्ये काऊंटरवरील काजू व शेव- चिवड्यावर ताव मारताना एक चोरटा कैद झाला आहे. त्याचप्रमाणे नोटांचे बंडल पिशवीत भरणारा चोरटा देखील दिसून आला आहे.