सोलापूर: बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी सोलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांना पूर्वी मुंबईला जावे लागत होते. सोलापुरातील विद्यार्थ्यांना सोलापुरातच करिअरची संधी देण्यासाठी केगांव येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाने बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठी संधी असल्याने अभियांत्रिकीची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी बायोमेडिकलमध्ये करिअर निवडावे, असे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र डी. गायकवाड यांनी केले आहे. गायकवाड म्हणाले की, अत्याधुनिक आरोग्य सेवेतील उपाय विकसित करण्यासाठी ही पदवी महत्त्वाची आहे. वैद्यकीय उपकरणे, निदान उपकरणे विकसित केली जातात.
आधुनिक वैद्यक शास्त्राच्या प्रत्येक पैलूला या माध्यमातून स्पर्श होतो. या क्षेत्रातील अभियंते एमआरआय मशीन, सिटी स्कॅनर आणि पोर्टेबल डायग्नॉस्टिक टूल्स यासारख्या उपकरणांची रचना आणि सुधारणा करीत आहेत. याशिवाय हृदय, हृदय गती आणि रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीचे निरीक्षण करणाऱ्या स्मार्ट घड्याळासारखे तंत्रज्ञान बायोमेडिकल अभियांत्रिकीच्या माध्यमातून शिकता
येणार आहे.
जटिल वैद्यकीय डेटाचे विश्लेषण करण्यासाठी, रोग निदानात मदत करण्यासाठी आणि रुग्णाच्या परिणामाचा अंदाज घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजिएन्सच्या माध्यमातून उपकरणे विकसित केली जात आहेत. बायोमेडिकल अभियांत्रिकीसह, एआय हे औषधांच्या रवींद्र गायकवाड निर्मितीकडे नेत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने प्रगत आरोग्य सेवा उपचारांचीही मागणी वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात कुशल बायोमेडिकल अभियंत्याचीही गरज वाढणार आहे. जगभरातील विद्यापीठे आणि संशोधन संस्था त्यांच्या जैववैद्यकीय अभियांत्रिकी कार्यक्रमाचा विस्तार करीत आहेत. भविष्यातील करिअरच्या संधी ओळखून भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाने हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. या अभ्यासक्रमासाठी ६० जागा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी या शाखेत प्रवेश घेऊन नव्या क्षेत्रात करिअर घडवावे, असे आवाहनही संस्थाध्यक्ष गायकवाड यांनी केले आहे.
बायोमेडिकल इंजिनिअरिंगला परदेशात उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी आहेत. परदेशात विशेषतः अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, कॅनडा या देशात मोठमोठ्या कंपनीत बायोमेडिकल इंजिनिअरिंग तसेच मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल संशोधन केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणित संधी असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.