ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावांवर सर्वबाद झाल्यावर भारताच्या पहिल्या डावात बहुतेक फलंदाज फेल होत असताना कॅप्टन रोहित शर्माने शतक ठोकत डाव सावरला आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नागपूर कसोटीत दमदार शतक झळकावलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला जात असून ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावांवर सर्वबाद झाल्यावर भारत फलंदाजी करत आहे. दरम्यान एकीकडे भारताचे बहुतेक फलंदाज फेल होत असताना कॅप्टन रोहित शर्माने शतक ठोकत संघाचा डाव सावरला आहे.
रोहित शर्माच्या नावावर खास विक्रमाची नोंद
विशेष म्हणजे रोहितने शतक झळकावताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (ODI, Test आणि T20) शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये केवळ चार खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. रोहितपूर्वी बाबर आझम, दिलशान आणि फाफ डू प्लेसिस यांनी हा पराक्रम केला आहे. दरम्यान रोहितने शतक झळकावताच मैदानात उपस्थित सर्वांनीच त्याचं टाळ्या वाजवून कौतुक केलं.