सोलापूर : एमपीएससी नोकर भरती तील ओबीसी आरक्षण रद्द करावे या मागणीसाठी छावा संघटनेच्या योगेश पवार यांनी राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. छावा संघटनेने एडवोकेट डी. एन. भडंगे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच एम पी एस सी चे अध्यक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. सरकारने या प्रकरणी दोन आठवड्यात निर्णय घेतला नाही तर आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचे छावा संघटनेचे योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय सरकारने नोकर भरतीमध्ये कोणतेही आरक्षण देऊ नये, अशी मागणी योगेश पवार यांनी केलेली आहे. यावेळी संघटनेचे संजय पारवे, रतिकांत पाटील, गणेश पाटील ,अविनाश पाटील उपस्थित होते.