सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने कै. शांतीसंग्राम शंकराप्पा धनशेट्टी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त जोडभावी पेठ येथील मातोश्री सेवा कुंज येथे कै. शांतीसंग्राम शंकराप्पा धनशेट्टी यांच्या समाधीस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, अन्नपूर्णा धनशेट्टी,शिवकुमार धनशेट्टी, सुलक्षणा धनशेट्टी,शुभम धनशेट्टी,जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे,सुरेश लिंगराज आदि मान्यवर उपस्थित होते.