दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगे गावात स्मशानभुमी मधिल दहनशेड आहे त्याचे छतास मधोमध मोठे एक राऊंड क्रॅक पडून एक मोठे छिद्र पडले व त्याचा वरचा छत कोसळला आहे त्यामुळे पावसाचे पाणी शेड मध्ये गळत होते या साठी ग्रामपंचायतीच्यावतीने बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे कडे नविन आर सी सी शेड बांधकाम करून मिळावे अशी मागणी केली होती.
बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व बालाजी अमाईन्स चे संचालक मंडळाच्यावतीने बक्षीहिप्परगे गावात स्मशानभुमी मधिल
१. नविन भार सी सी दहनशेड शवदाहिनी
२. स्मशानभुमी मध्ये लोकांना बसण्याकरीता वेटींग शेड.
३. स्मशानभुमी मधिल रस्ता.
४. स्मशानभुमी मधिल फरशीकरण.
५. स्मशानभुमी मध्ये ३००० लि सिमेंटची पाण्याची टाकी,
अश्या विविधकामाना मंजुरी दिली.
बक्षीहिप्परगे गावातील स्मशानभुमी मधिल नविन आर सी सी दहनशेड व वेटींग शेड च्या कामाचे भुमीपुजन बालाजी अमाईन्सचे तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार यांचेहस्ते श्रीफळ वाढउन आज सकाळी करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य विश्रांत गायकवाड यांनी बालाजी अमाईन्सच्या वतीने स्मशानभुमी मधिल नविन शेड बांधकाम सुरू करण्यात आले.
त्या बददल व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाचे आभार मानले व मल्लिनाथ बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विश्रांत गायकवाड यांनी बालाजी अमाईन्सच्यावतीने सोलापूरातील तुळजापूर रोड स्मशानभुमी मध्ये विदयुतदाहीनी जसे काम झाले आहे त्याचप्रमाणे येथे एक छान स्मशानभुमी होणार जुनी शेड मध्ये पाणी गळून त्रास होत होता तो आता लवकरच संपणार याकरीता व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यकमास प्रसंगी गावाचेसरपंच मनोज महाडीक, माजी सरपंच सिताराम राठोड, ग्रामपंचायत सदस्य विश्रांत गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब जाधव, बाबासाहेब माने, शंकर यादव, गणपत शिंदे, रमेश शिवशरण ,विश्वास निकंबे, अण्णासाहेब जाधव, बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर बसवराज अटद तसेच बक्षीहिप्परगे गावातील नागरीक उपस्थित होते.