सोलापूर – संस्कारक्षम मुले घडवा. विद्यार्थ्यामध्ये देशभक्ती रूजवा. दिनांक 22 जुलै रोजी सर्व शाळांमध्ये “एक सभा तिरंग्यासाठी” आयोजित करावी. वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची घराघरात जागृती करा. दशसुत्री शिक्षण पध्दती मध्ये सुधारणा होईल. असे भावनिक आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व शाळा मधील प्राथमिक शिक्षकांसाठी आज फेसबुक लाईव्ह द्वारे दशसुत्री च्या अंनलबजावणी साठी विशेष कार्यक्रमाच्या आयोजन करणेत आले होते. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व शिक्षक यांना आज सिईओ दिलीप स्वामी यांनी आॅनलाईन फेसबुक लाईव्ह द्वारे मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिक्षणाधिकारी किरण लोहार, उप शिक्षणाधिकारी संजय जावीर, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, सुहास गुरव, हरीश राऊत, अतहर दफेदार, ग्यान प्रकाश फाऊंडेशन चे संभाजी रोडे, उपस्थित होते
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर “ हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविणे साठी सिईओ यांनी भावनिक आवाहन करीत प्राथमिक शाळा मध्ये संस्कारक्षन विद्यार्थ्यी घडविणे साठी व गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी सिईओ दिलीप स्वामी यांचे कल्पकतेतून दशसुत्री तयार करणेत आली आहे. याची सर्व शिक्षकांनी माहिती होणे साठी त्यांनी आज भावनिक आवाहन केले .
दिनांक 22.07.2022 रोजी सर्व शाळांमध्ये एक सभा तिरंग्यासाठी आयोजित करावी. सदर सभा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी.दिनांक 25 जुलै रोजी ‘माझा तिरंगा माझा अभिमान’ या विषयावर सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात यावी. (इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचा एक गट, इयत्ता 9वी व 10 वी साठी एक गट व इयत्ता 11 वी व 12 वी साठी एक गट करावा.) सदर निबंध स्पर्धा घेण्याचे आयोजनाची जबाबदारी गट शिक्षणाधिकारी यांची राहील.’ हर घर तिरंगा’ हा जास्तीत जास्त घरावर कसा लागेल याचे नियोजन करावे. असे आवाहन केले.
सायकल बॅंकेतून आठशे मुलींना लाभ –
……………..
एखादे काम मनावर घेतले कि शिक्षण विभागातील सर्व लोक जिवापाड कामे करतात. याचा प्रत्येक स्वच्छ सुंदर शाळा मध्ये आला आहे. निमगाव प्राथमिक शाळेने सुरू केलेली सायकल बॅंक ८०० मुलींना हातभर देऊ शकली. पंचायत राज समितीने देखील यांचे कौतुक केले.
खाजगी शाळेतील चार हजार मुले जिल्हा परिषदे शाळांत दाखल
……..,….
चांगले काम केले कि पालक जिल्हा परिषदे कडे वळतात. खाजगी शाळेतील चार हजार मुले जिल्हा परिषदे शाळांत दाखल झाली आहेत. याचा विचार करता प्राथमिक शिक्षकांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. दशसुत्री ची प्रभावी अंमलबजावणी करा असे आवाहान सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
शाळा मधीस ४० बालकांचे जीव वाचले…!
…………..
माझे मुल माझी जबाबदारी अभियानात ८ लाख पेक्षा अधिक बालकांची तपासणी झाली. यामधील दुर्धर आजारातील हालते समोर आली. त्याचेवर उपचार केले मुळे त्यांची अपंगत्व व जीव वाचवू शकलो. कुणाचे हृदयाला छिद्र होते तर एका विद्यार्थ्याचे डोळ्यास इजा होती. हे काम महत्वाचे झाले आहे. पालकांचे आशिर्वाद शिक्षकांना मिळतील.
नकारात्मक भावनेतून काम करू नका
…………..
सकारात्मक रहा. हा माझा कार्यक्रम आहे. नी दशसुत्रीची अंमलबजावणी करणार असे मनाला ठणकावून सांगा. देशभक्ती व मातृभक्ती जागवा. किती शिक्षकांना विद्यार्थी. जाता येतां नमस्कार करतात ? गुरुकुल पध्दती विसरलो का नवीन प्रयोग करा. सघ्या विज्ञानात काय क्रांती सुरू आहे ते पहा.
सिईओंनी जागविले मामांचे आठवणी ..!
…………….
सिईओ दिलीप स्वामी यांचे मामा शिक्षक होते. विद्यार्थ्यांनी कसे हातवारे करून झाडाखाली शिकवायचे याचा परिपाठ करून सिईओ यांनी दाखविला. विद्यार्थ्याला हसत खेळत शिक्षण द्या.
विद्यार्थी आहेत म्हणून शाळा आहे
…………….
परिक्षेस ९९ टक्के गुण मिळविणारे स्पर्धा परिक्षेस टिकत नाहीत. ३५ टक्के मार्क घेणारे देखील अधिकारी होतात. स्पर्धात्मक परिक्षेस कसे सामोरे जायचे त्यांना शिकवा. असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.विद्यार्थी आहेत म्हणून शाळा आहे हे लक्षात ठेवा. सोलापूर जिल्ह्सात शैक्षणिक क्राती होऊ द्या यासाठी प्रमाणिक पणे प्रयत्न करा असे भावनिक आवाहन केले.