सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
सोलापूर :बार्शी : संविधानासह घटनेतील नियमांचे प्रत्येकाने वाचन करुन जीवन जगताना प्रत्यक्ष कृतीत आचरणात आणावे तसेच शाळेतील सर्व शिक्षक ांसह विद्यार्थ्यांनीही भारतीय संविधानाची माहिती सर्वांना द्यावी. सर्वसामान्यांना संविधानाने दिलेले हक्क, अधिकार माहिती होण्यासाठी भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन सोलापूरचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले.
संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या बार्शी येथील सिल्व्हर जुबिली हायस्कूलमध्ये आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, उपमुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी, पर्यवेक्षिका अनुराधा विश्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. संविधान दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर संविधानाच्या उद्दिशीकेचे वाचन सर्व उपस्थितांनी केले.
यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शाळेसाठी भारतीय संविधानाच्या ५ प्रती भेट दिल्या. यावेळी ई.१० वीची विद्यार्थिनी वृंदा सुपेकर, सिमरन जानराव, इ. ८ वी चा प्रंशुत डमरे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांनी केले. उपमुख्याध्यापक अनिरुद्ध चारी यांनी आभार मानले. पर्यवेक्षिका अनुराधा विश्वेकर व इतर गुरुजनांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.