सोलापूर – चर्मकार समाज विकास मंडळ, सोलापूर च्या वतीने रविवार दि 01-जून 2025 रोजी जगदीशची गार्डन अँड लॉन्स, विजापूर रोड, सोलापूर येथे चर्मकार समाजातील उपवर युवक युवती (वर-वधु), घटस्फोटीत, विधवा-विधुर तसेच दिव्यांग यांचे वधू वर परिचय संमेलन (मेळावा) आयोजित केले असल्याची माहिती मुख्य निमंत्रक राजशेखर जेऊरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर वधू वर परिचय संमेलन हे पूर्णतः विनामूल्य असून यांचा लाभ सर्व समाज बांधवानी घ्यावा असे आवाहन मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक हरिदास टोणपे यांनी केले आहे.
परिचय संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून भारत वाघमारे (उप जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा) व मा. शोभा जाधव (निवासी उप जिल्हा अधिकारी, धाराशिव जिल्हा) हे उपस्थित राहणार असून उपस्थित सर्वांना कार्यक्रमांच्या ठिकाणी विनामूल्य भोजन व्यवस्था केली आहे.
सोलापूर शहरात 5 ठिकाणी व ग्रामीण भागात 3 ठिकाणी नोंदणी कक्ष स्थापन केले असून सदर ठिकाणी परिचय पत्र भरून नोंदणी करावी. तसेच Google form link व WhatsApp group द्वारे ही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
नाव नोंदणीसाठी व अधिक माहिती साठी मंडळाचे निमंत्रक परशुराम शिंदे मो क्र. 9730813046 व वामन घुळराव मो क्र. 9423376225 यांच्याशी संपर्क साधावा.
सदर पत्रकार परिषदेस मुख्य निमंत्रक राजशेखर जेऊरकर, जेष्ठ मार्गदर्शक हरिदास टोणपे, वामन धूळराव, परशुराम शिंदे, सुधीर बनसोडे, संगीता शिंदे, दत्तात्रय शिंदे, श्रीकांत मनुखाने, शिवपुत्र हरवाळकर, शावराण्या बाघमारे, मल्हारी बनसोडे अंबादास चाबुकस्वार, अंबादास बाघमारे, रेवणसिद्ध व्हनमराठे, दत्तात्रय हरवाळकर, राजची खडतरे, शिवपुत्र तोळणुरे, सुनीता बनस्कर, पौर्णिमा बसर्गीकर, सुहास राजभोज, ज्योती बनसोडे, सुनीता कांबळे उपस्थित होते.