सोलापूर- सोलापूर शहराची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचे काम स्मार्ट सिटी योजना,एनटीपीसी आणि महापालिकेच्या निधीतून समांतर जलवाहिनीचे काम सुरू असून.उजनी धरणावर सोलापूर महापालिका आणि उस्मानाबाद नगरपालिकेचे पंपगृह आहे. दोन्हीं पंपगृहांच्या मधोमध समांतर जलवाहिनीचा जॅकवेल होत आहे.पोचमपाड कंपनीला पावसाळ्यापूर्वीच जॅकवेलची जागा ताब्यात देण्यात आली. पावसाळ्यात उजनी धरण काठोकाठ भरते.
पाणी वाढल्यानंतर जॅकवेलच्या कामाला अडथळा येऊ नये म्हणून धरणाच्या काठावर मातीचा मोठा बंधारा टाकण्यात आला. जॅकवेलसाठी खोदाई सुरू झाली. पोचमपाड कंपनीच्या लोकांनी बंधारा टाकण्यात हलगर्जीपणा केला.त्यामुळे उस्मानाबाद जॅकवेलच्या बाजूने बंधाऱ्यात पाणी शिरले. सध्या बंधारा पाण्याने काठोकाठ भरल्याने खोदाईचे काम थांबले होते ते काम संबंधित मक्तेदार संथगतीने करत आहे, केवळ दोन टक्के काम झाले असून जिथे काम सुरू आहे त्या जागेत पाणी घुसले आहे, याच पार्श्वभूमीवर शनिवारी महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, विरोधी पक्षनेते अमोल बापू, गटनेते रियाज खरादी, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक नागेश भोगडे, पाणी पुरवठा अधिकारी संजय धनशेट्टी, यांच्या शिष्टमंडळाने जॅकवेलच्या जागेची पाहणी केली, मक्तेदाराचा या कामात हलगर्जीपणा दिसून आला, कामाची संपूर्ण जागा पाण्यात आहे, स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचे ही लक्ष नाही, महापौर कार्यालयाकडून मक्तेदार व स्मार्ट सिटीचे सीईओ त्रिंम्बक ढेंगळे पाटील यांना कार्यालयीन पत्र गेले मात्र या उजनी भेट दौऱ्यात कुणीही आले नाही.एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूर शहरासाठी दुसरी समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या जलवाहिनीसाठी धरण परिसरातील जिथून पाणी उचलले जाते त्याठिकाणी प्रथम जॅकवेलचे काम करणे महत्वाचे आहे, ते काम संबंधित मक्तेदार संथगतीने करत आहे, केवळ दोन टक्के काम झाले असून जिथे काम सुरू आहे त्या जागेत पाणी घुसले आहे संबंधित मक्तेदारावर व तसेच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.दुहेरी पाईपलाईन आणि उजनी धरणातील जॅकवेल कामांमध्ये होत असलेली दिरंगाई योग्य नाही तसेच वरवडे टोल नाक्याजवळ असलेल्या ब्रेक प्रेशर टॅंकची पाहणी केली असता तेही काम फेल गेल्याचं दिसून आलं. हे काम सुध्दा जॅकवेल करणारा मक्तेदार यांच्याकडून होत आहे. वेळेच्या आत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे तसे होत नसेल तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी यावेळी बोलताना दिली. उजनी धरणात जॅकवेल टाकण्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि मक्तेदारांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी यावेळी केली.