येस न्युज नेटवर्क : नाशिक महापालिकेच्या वादग्रस्त शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अशातच धनगर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश राज्याचे उपसचिव टी. वा. करपते यांनी काढले आहेत.
काही दिवसांपूर्वी नाशिक मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाच घेताना अटक करण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्षण विभागातील सर्वात मोठी कारवाई करत एसीबीने धनगर यांच्या घरातून कोटींचे घबाड बाहेर काढल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याच्यातच नागरिकांकडून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली. दरम्यान सुनीता धनगर यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शासन निर्णयानुसार पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत 48 तासांपेक्षा अधिक काळ राहिल्यास सरकारी सेवेतील व्यक्तींना शिक्षण निलंबित केले जाते. त्यानुसार लाचखोर सुनीता धनगर यांना निलंबित करण्यात आले आहे.