- अंबड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जालना : अंबड येथील एका तीन महिन्याच्या चिमुकल्याला पाण्याच्या टाकीत टाकून हत्या झाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये घडलीये. अंबड येथील आंबेडकर नगरमधील विजय जाधव आणि पायल जाधव हे आपल्या बाळासोबत घराबाहेर झोपले होते. पहाटे तीन वाजता पायल उठली असता बाळ झोळीत दिसून आलं नाही. त्यानंतर घटनेची पोलिसांना माहिती देवून बाळाचा शोध सुरु केला असता घरा बाहेरील प्लास्टिकच्या टाकीत बाळ मृत अवस्थेत आढळून आलं. दरम्यान पायल जाधव यांच्या फिर्यादीवर अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये.