पॅथॉलॉजिस्ट डॉ. देखणे यांना जीवन गौरव तर उद्योजक कुलकर्णी यांना समाज भूषण पुरस्कार
सोलापूर – येथील ब्राह्मण समाज सेवा संघ आणि डॉक्टर त्रिंबक लक्ष्मण चाटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सात आठ वर्षापासून ब्राह्मण समाजातील व्यक्तींना जीवन गौरव आणि समाज भूषण असे पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. यावर्षी जीवनगौरव पुरस्कारासाठी पॅथॉलॉजिस्ट डॉ. अरविंद देखणे आणि समाजभूषण पुरस्कारासाठी मूळचे सोलापूरचे आणि सध्या नाशिकमध्ये उद्योजक असलेले मुकुंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष दत्तराज कुलकर्णी आणि डॉ. चाटी ट्रस्टच्या प्रमुख मीनाताई चाटी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हा पुरस्कार वितरण सोहळा ३० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शिवस्मारक सभागृहात मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि राज्याचे माजी महाआधिवक्ता अशुतोष कुंभकोणी यांच्या हस्ते होणार आहे.
अकरा हजार रुपये रोख, शाल, श्रीफल, पगडी असे जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकार परिषदेस नितीन कुलकर्णी, आश्लेषा निपुणगे, अमर कुलकर्णी, राजन दिक्षित, अमर कुलकर्णी, जयतीर्थ पडगानूर, विक्रम डोनसळे, डॉ. गिरीष कुमठेकर, दत्तराज कुलकर्णी, वामन कुलकर्णी, राम तडवलकर आदी उपस्थित होते.