उत्तर सोलापूर : तालुक्यातील अकोलेकाटी या गावांमध्ये दारूबंदीसाठी गेले पंधरा दिवसापासून संघर्ष पेटला आहे त्यासाठी आज दारू बंद म्हणजे बंद हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रहार संघटनेच्या वतीने अकोलेकाटी या गावात ग्रामपंचायत समोर लाक्षणिक बाटली बजाओ आंदोलन करण्यात आले .आंदोलनाच्या ठिकाणी तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
आंदोलनामध्ये प्रहार औद्योगिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू जांभळे, प्रहारचे तालुका अध्यक्ष फिरोज पठाण, कार्याध्यक्ष शाहूराजे लामकाने ,अकोलेकाटी शाखा अध्यक्ष मनोज जांभळे तसेच आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भाजपचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील व गावातील अनेक महिला व नागरिकांनी आंदोलनाला उपस्थिती राहून पाठींबा दिला.दारूबंदी साठी ग्रामपंचायत व तालुका पोलीस काय करणार याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.