येस न्युज मराठी नेटवर्क । सावधान इंडिया मालिकेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टार इंडियाची मालिका सावधान इंडियाच्या दोन क्रू मेंबर्सचा रस्तावर अपघात झाल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. यापैकी एकाची ओळख सहायक आर्ट डायरेक्टर प्रमोद अशी आहे तर दुसर्या व्यक्ती सेटवर हेल्पर म्हणून काम करत होता. मात्र, अद्याप त्या व्यक्तीचे नाव समजून शकले नाही. हे दोघेही 20 तासांची शिफ्ट करून घरी जात होते आणि त्याचवेळी हा अपघात घडला आहे.
पण नेमका हा अपघात कसा घडला याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार प्रमोद शनिवारी पहाटे सावधान इंडिया मालिकेचे काम संपवून घरी जात होते. ते दुचाकीवरून घरी जात होते त्याच्यासोबत अजून एक क्रूमेंबर देखीलसोबत होता. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, परंतु ते वाचू शकले नाहीत.