अकलूज / प्रतिनीधी – संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दोघांचा मृत्यु झाला आहे .
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात छायाचित्रण करण्यासाठी पश्चिम बंगाल येथील कल्याण चट्टोपाध्याय ( वय ४८ ) हे बुधवारी आले होते . गुरुवारी पुरंदावडे येथे रिंगण सोहळ्याचे छायाचित्रण करीत असताना स्वाराचा व माउलीचा अश्व धावत असताना स्वाराच्या अश्वाचा मागील उजवा पाय माउलीच्या अश्वाच्या लगाम मध्ये अडकल्याने तो धावत असताना अडखळला व रिंगण पाहण्यासाठी बसलेल्या भाविकांच्या अंगावर पडला . त्यामध्ये दोघे जखमी झाले .
कल्याण चट्टोपाध्याय हे मिताली अपार्टमेंट, मोंडल पारा रोड,नॉर्थ 24,पर्गानास, बारानगर, कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथील रहिवासी होते .याबाबत सोलापुर ग्रामिणच्या अकलुज पोलीस ठाण्यामधे अनैसर्गीक मृत्युची नोंद आज सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान केली. आशुतोष अप्पासाहेब कोळी(रा.जयसिंगपुर,जि.कोल्हापुर) यांनी खबर दिलेली आहे. पोलिस निरिक्षक भानुदास निंभोरे यांनी दिलेल्या माहीतीनुसार, माऊलीच्या पालखी सोहळ्यात गोल रिंगण सुरु असताना अश्व पडल्याने चटोपाध्याय यांना चक्कर आली. आणि ते बेशुध्द पडले. त्यानंतर अकलुज येथे उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथिल डाॅक्टरांनी उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगीतले.
याबाबत पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी सदरची दु:खदायक घटना असल्याचे सांगीतले. घटनेचे चित्रीकरण पाहील्यास मागच्या अश्वाचा अंगभाग हा व्यक्तीच्या अंगावर पडल्याचे दिसतेय. अशा वेळी पोलीस आणि एनएसएसचे विद्यार्थी यांनी उपचारासाठी रुगाणवाहीका करुन दिली. चटोपाध्याय हे हौशी छायाचित्रकार होते. आज माळशिरस मुक्कामी समाज आरतीमधे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली . तसेच वीमा रक्कम मिळण्यासाठी आळंदी देवस्थानकडुन प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले .
वारकऱ्याचे हृदयविकाराचे झटक्याने निधन:-
जगद्गुरु संत तुकाराम महाराज दिंडी चे आगमन आज अकलूज येथे झाल्यानंतर उद्धव बुवा महाराज यांचे दिंडी मधील रथा पाठीमागे असलेल्या दिंडी क्रमांक 34 मधील वारकरी विनायक यशवंत पवार ( वय 65 ) राहणार नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव हे आज रोजी सकाळी विजय चौक अकलूज येथे दिंडीमध्ये असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते मयत झाले असल्याची खबर त्यांचे नातेवाईक भाचा बलभीम लक्ष्मण निरगुडे राहणार बलसुर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांनी दिले वरून अकलूज पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नंबर 54/2024 बी एन एस एस 194 प्रमाणे दाखल असून मृत प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार दीपक भोसले हे करीत आहेत.