कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात आयोजित केलेल्या महामेळाव्याला जाताना महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकच्या सीमेवर अडवण्यात आले. यावेळी मविआच्या नेत्यांवर कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दीड तास तणावपूर्ण वातावरण होतं. तसंच, या तणावपूर्ण वातावरणात कन्नाडिगांविरोधात रस्त्यावरच आंदोलन करण्यात आले.
बेळगाव येथील मराठी भाषिकांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी बांधवांसाठी महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. यासाठी महाविकास आघाडीचे नेते कागल येथे एकत्र जात होते. माजी मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.