धनिकानी गरीब विद्यार्थ्यांच्या पुस्तकासाठी मदतीचा हात देणे गरजेचे – धाराशिवकर
सोलापूर : ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी शहरामध्ये शिक्षणासाठी येतात मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कॉलेजची सर्व पुस्तके घेणे शक्य होत नाही अशा विद्यार्थ्याकरिता पुस्तक बँकेच्या माध्यमातून आपण प्रत्येक कॉलेजला पुस्तके भेट देऊन मदत करत आहोत आर्ट आणि सायन्स या दोन्ही विभागाच्या विद्यार्थ्याकरिता पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याकरिता धनिक आणि मदत करणे गरजेचे असल्याचे मत शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी व्यक्त केले.
दयानंद कॉलेज येथील आर्थिक दुर्बल घटकातील अकरावी बारावी वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सहसचिव प्रा. विजयकुमार उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश धाराशिवकर यांनी आर्ट आणि सायन्स या विभागाची पुस्तके कॉलेजकडे सुपूर्त केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात धाराशिवकर हे बोलत होते.
महेश धाराशिवकर मित्र परिवाराच्या वतीने अशीच पुस्तक बँक संगमेश्वर कॉलेज येथे सुद्धा कार्यरत आहे.
याप्रसंगी प्रभारी सचिव प्राध्यापक विजयकुमार उबाळे यांनी सदर संकल्पनेचे कौतुक करून समाजातील नाही रे वर्गासाठी कोणीतरी पुढे येणे गरजेचे आहे व तुम्ही आलात याबद्दल कॉलेजच्या वतीने आभार मानले. यापूर्वी महेश धाराशिवकर मित्र परिवाराच्या वतीने वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांची फी भरून ते विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याबरोबरच शिवदुर्ग संवर्धनासाठी देखील आर्थिक मदत करण्यात आली आहे.
याप्रसंगी शिवसेना शहर उपप्रमुख ओंकार चव्हाण ,मनोहर गुर्रम, प्राचार्य शिंदे ,उपप्राचार्य खांडेकर ,यांच्यासह इतर प्राध्यापक व आसावाचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार व शिक्षक जोजन मादळे बिराजदार पवार उपस्थित होते.