येस न्युज मराठी नेटवर्क । देशाची शान असलेल्या ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर ताजमहाल परिसरात जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र ही निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं आहे.
मात्र ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती खोटी असल्याची माहिती आग्र्याचे पोलीस महानिरीक्षक ए सतीश गणेश यांनी दिली. फिरोजाबाद येथील एका व्यक्तीने फोन करुन ही खोटी माहिती दिली होती. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. बॉम्बची माहिती मिळताच ताजमहाल परिसरात मोठ्या प्रमाणात सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, आता संपूर्ण ताजमहालमध्ये शोध मोहीम राबवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.