येस न्युज नेटवर्क : पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीन जिलेटीनच्या कांड्या पोलिसांनी घेऊन निकामी करण्याची कारवाई सुरू केली. रेल्वे स्टेशन परिसरात घबराट पसरली आहे. रेल्वे स्टेशन परिसर रिकामा करण्यात आला असून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आलीय. बॉम्ब शोधक पथकाने मोकळ्या जागेत बॉम्ब सदृश वस्तू निकामी करण्यासाठी नेली आहे. फलाट क्रमांक एक परिसर रिकामा करण्यात आला आहे. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक घटनास्थळी दाखल झाले असून ते घडमोडींवर नजर ठेऊन आहेत.