सोलापूर । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताचा तूटवडा खूप पडलेला आहे जनतेने रक्तदान करावे असे आव्हान केले होते. आरटीओ कार्यालयात विविध कामानिमित्त लोक येत असतात, मुख्यमंत्र्यांच्याआव्हानाला प्रतिसाद देत आरटीओ कार्यालयात मागील आठ दिवसापासून, आरटीओ कार्यालय व सिद्वेश्वर रक्तपिढी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी जनतेस आव्हान केले कि, रक्तदान करा “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे” त्याला जनतेने उत्तस्पुर्त प्रतिसाद दिला, 327 जणांनी रक्तदान शिबीर मध्ये सहभाग घेत रक्तदान केले.
आरटीओ कार्यालयाने राबविलेल्या रक्तदान शिबीर या उपक्रमामुळे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. आरटीओ मधील अधिकारी व कर्मचारी यांनी पण रक्तदान करून शिबीर मध्ये सहभाग नोंदविला. तसेच मोटर ड्रायविंग स्कुल चे संचालक, मोटार वाहन संघटना, वाहन डिलर प्रतिनिधी यांनी पण सहभाग नोंदविला. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी पोपट पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव तसेच मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ, अमित गुरव, प्रदीप बनसोडे, किरण गोंधळे, अविनाश आंभोरे, आशिष पाराशर, विनोद चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.
तसेच सिद्धेश्वर रक्तपिढी सोलापूर येथील अजय जाधव, समाधान सरडे, संतोष गायकवाड, विजय सारवाडकर, सुभाष ढालायात, माधुरी जवळकोटे, ज्योती महामुनी यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामकाज पार पाडले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी रक्तदात्यांचे आभार व धन्यवाद व्यक्त केले.