उत्तर सोलापूर (प्रतिनिधी) :- वडाळा गावचे सरपंच व श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र साठे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.2 ) आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 210 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक कार्याची बांधिलकी सिद्ध केली.
राज्यातील झालेले सत्तांतर आणि पावसाळा सुरु होऊनही एक महिन्यापासून पावसाने दिलेली हुलकावणी,यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जितेंद्र साठे यांनी घेतला होता. परंतु, गावातील व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्थेतील विद्यार्थी व कर्मचारी यांनी रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प केला. ऐनवेळी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला आणि तब्बल 210 जणांनी रक्तदान करुन जितेंद्र साठें यांच्यावरील प्रेमाची पाखरण केली. मार्डीचे सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, कार्याध्यक्ष सुनील भोसले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सुवर्णा झाडे, डॅा.वैशाली साठे, बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर, प्रभारी प्राचार्य डॅा.विकास शिंदे, प्राचार्य शंकर खळसोडे, प्राचार्य सरोदे,मुख्याध्यापक संजयकुमार वाघमारे, अधीक्षक अजित परबत, अकोलेकाटीचे सरपंच भाऊ लामकाने, माऊली महादाजी गोफणे, मंजूर शेख, दयानंद शिंदे, बालाजी गरड, राजाराम गरड, उपसरपंच अनिल माळी, भारत बोंगे, प्रवीण भालशंकर, प्रभाकर गायकवाड, बाळासाहेब सुतार, संपत गाडे, जीवन साठे, दिनेश साठे, हरिभाऊ घाडगे, मनोज साठे, मेजर आबासाहेब आवताडे, जयदीप साठे, पांडुरंग लंबे, महेश लंबे, अशोक लंबे, नागेश पवार, कल्याण काळे, भारत माळी, नागेश माळी, परमेश्वर थिटे,स्वप्नील कदम, शंभु गायकवाड, हनुमंत गायकवाड, विश्वास साठे, राजेंद्र हिप्परगी, देवीदास लामकाने, सागर यादव, सचिन बामणकर, विकास गाडे, शरद गायकवाड, दत्तात्रय वीर, गणेश सुपाते, स्वप्नील कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संकुलाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, जितेंद्र साठे मित्रमंडळ, जयदीप साठे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
वाढदिवसाबद्दल प्रतिक्रिया देताना जितेंद्र साठे म्हणाले, सामान्य लोकांच्या हाकेला ओ देऊन आजही जिल्ह्याचे नेते काकासाहेब साठे हे दररोज पायपीट करतात.वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांचे सामाजिक व पक्षाचे कार्य तरुणाला लाजवेल असेच आहे.सामान्यांचे आश्रु पुसून जनतेच्या सुखातच काका स्वतःचे सुख पाहतात. त्यांच्या या कार्याचा वसा घेऊन तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहीन, हाच वाढदिवसाचा संकल्प आहे. वाढदिवस साजरा करायचा नव्हता. मात्र रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचा हट्ट कार्यकर्त्यांनी धरल्यामुळे माझा नाविलाज झाला.