सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोन्या मारुती जिल्हा संपर्क कार्यालय या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, अनाथ मुलांना खाऊ वाटप, आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे ,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख ,मनविसे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हा सचिव अभिषेक रंपुरे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे ,वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, जिल्हा विधी विभाग अध्यक्ष ऍड .मनोहर फुलमाळी .वाहतूक सेनेचे शहर संघटक जितू टेंभुर्णीकर ,शहर उपाध्यक्ष पवन देसाई, कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत कोकरे, राहुल अक्कलवाडे, भारत मनसा वाले ,जिल्हाउपाध्यक्ष अमोल घाडगे ,दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचुटे, महिला आघाडीच्या शहरात शहराध्यक्ष जयश्रीताई हिरेमठ, उपाध्यक्ष अंबिका सावंत आदि उपस्थित होते.