उत्तर सोलापूर : तालुक्यातील कारंबा या गावातील ग्रामदैवत बडीबी माँ साहेब उरूस निमित्त येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून या वर्षी नवीन निवड झालेल्या मुस्लिम समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी माझं गाव माझी माणसं फाऊंडेशनचे प्रमुख विनायक सुतार, ग्रामपंचायत सदस्य इन्नूस शेख, अशोक बहिर्जे, मल्लिनाथ बहिर्जे, श्रीकांत आदाटे, मुस्लिम समाज खजिनदार महबूब साहेब शेख, बापूसाहेब पाटील ,कलीम शेख, ईसुफ शेख ,प्रशांत जगताप शहाजी गायकवाड ,राहुल मस्के ,अकलाक जाहगीरदार, बडेसाब शेख ,सत्तारभाई शेख ,सुहास थोरात, प्रशांत होळकर आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अकबर पटेल, मैनुद्दीन इनामदार, समीर पठाण, अलीम पठाण, हरून शेख, सद्दाम शेख, मोईन शेख, हनिफ जहागिरदार आदींनी प्रयत्न केल्यामुळे 51 रक्तदात्यांनी रक्तदान दिले. रक्त संकलन करण्यासाठी सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बँकेचे अजय जाधव,रोहित बगले साईश्वरी येमुल, ज्योती महामुनी उपस्थित होते