अकोला : भाजपचे नेते शेतकऱ्यांवर काहीच बोलत नसल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं. अकोल्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना मराठीतून बोलण्याचा आग्रह केला. सध्या देशात अनेक प्रश्न आहेत. जनतेच्या प्रश्नावर आम्हाला संसदेत बोलू दिलं नाही. देशात महागाई आहे, रोजगार नाहीत, शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. तसेच आमची यात्रा रोखून दाखवा, असे म्हणत त्यांनी आव्हान दिलं. जनतेचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
भारत जोडो यात्रेतून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांनी ही यात्रा रोखावी, असेही राहुल गांधी म्हणाले. सध्या देशापुढे दोन मोठ्या समस्या आहेत. देशातच युवकांना रोजगार मिळत नाही. दुसरे म्हणजे सध्या शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळत नसल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. शेतकरी वेळेला पीक विमा भरतात मात्र, त्यांना पैसे मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. त्यांचे कर्ज माफ होत नाही, संकटाच्या काळात त्यांना मदत मिळत नसल्याचे गांधी म्हणाले. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.