संक्रांतीनिमित्त श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम !
सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व महिला ग्रुप च्या वतीने संक्रांती निमित्ताने अंध दिव्यांग महिला भगिनींसाठी आयोजित हळदी – कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून “पांढरी काठी” देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व महिला ग्रुप च्या वतीने संक्रांती निमित्त दरवर्षी क्षेत्रातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ती पंरपरा जपत यंदा कर्णिक नगर येथील यल्लालिंग महाराज मठ येथे अंध दिव्यांग महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. अंध व्यक्ती चालताना व फिरताना जी पांढरी काठी वापरतात. त्यामुळे या भगिनींना चालताना एक आधार व्हावा यासाठी “पांढरी काठी” वाण म्हणून देण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मसाक्ष संस्थेचे अध्यक्ष श्वेता व्हनमाने, संघटनेचे मार्गदर्शक ज्योती कासट, जयश्री जवळे, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश येळमेली यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अंलकुटे,
सुवर्ण पोरे, भारती जवळे, शितल लखोटिया, शिला तापडिया, नर्मदा कणकी, अर्चना बंडगर, सुजाता सक्करगी, सारिका मदने, प्रतिक्षा बिज्जरगी, शिल्पा अलमेलकर, श्रेया जवळे, मनस्वी जवळे, संतोष अंलकुटे, शिवशंकर जवळे, उद्यशंकर जवळे, महेश भाईकट्टी, आकाश लखोटिया, गोपाळ धुत, संतोष लकडे आदींनी परिश्रम घेतले.
समाजाला अधिक संवेदनाक्षम होण्याचा संदेश ‘”पांढरी काठी” देते : महेश कासट
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या यापूर्वी महिलांना हालवाई दागिनचे प्रशिक्षण देण्यात आले. विट भट्टी मंजूर महिलांना कडधान्य वाटप केले. फुटपाथवर वरील महिलांना आवश्यक वस्तू ताट व ग्लास देण्यात आले. असे विविध उपक्रम राबविण्यात आले. अंध व्यक्तींना दिशा दाखविण्याचे काम “पांढरी काठी” करते. समाजाला अधिक संवेदनाक्षम, सहृदय होण्याचा एकप्रकारे संदेश ही ‘पांढरी काठी’ देत असते. अंध व्यक्ती चालताना व फिरताना जी पांढरी काठी वापरतात. यामुळे ही काठी यंदा वाण म्हणून देण्यात आली, अशी माहिती
संस्थापक महेश कासट यांनी दिली.