सोलापूर : ऐन सणासुदीच्या काळात घरोघरी व रस्त्यावर कचरा असताना घंटागाडी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. घंटागाडी मक्तेदार हे घंटागाडी वरील कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देत नाहीत वेतनामध्ये कपात करतात. त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मलिदा खाणाऱ्या व वेळेवर वेतन न करणाऱ्या घंटागाडी मतदारावर फौजदारी दाखल करा अशी मागणी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली आहे.

तसेच घंटागाडी कर्मचाऱ्याचे वेतनाचे प्रश्न मार्गी लावून कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी न्याय मिळवून द्यावा. आणि घंटागाडी मक्तेदाराला काळया यादीत टाकून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार जमा करण्यात यावे अशी सुद्धा मागणी नगरसेवक पाटील यांनी केली. घंटागाडी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच, विमा योजना, काहींना प्रायव्हेडन्ट फंड न देणे, ड्रायव्हर व बिगारी यांचे वेतन कागदोपत्रीपेक्षा कमी देणे अशी पिळवणूक गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. सदर घंटागाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून शहरातील कचरा न उचल्यास आम्ही महानगर पालिकेच्या आवारात कचरा आणून टाकून आंदोलन करणार आहे.