सोलापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीने बांधला गेलेला पक्ष आहे. पक्षाचा प्रसार उत्तम व्हावा यासाठी व पक्षाच्या योजना जनतेपर्यंत कशा पोहोचतील यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा, पक्षाचे कार्यक्रम, विविध योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहचवावा, भाजपाचे काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहर दक्षिण – पश्चिम मंडल आणि पूर्व मंडल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन करताना आ. देशमुख बोलत होते. याप्रसंगी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शहरप्रमुख सरचिटणीस शशी थोरात, रुदरेश बोरामणी , राज्य कार्यकार्य कारिणी सदस्य शहजी पवार, सभागृह नेते श्रीनिवास करली, युवा नेते मनिष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होते. शिबिरामध्ये दिवसभरात विविध विषयांवर 6 सत्रात व्याख्यान झाले. अरविंद जोशी यांनी भारतीय राजकारणातील बदल व भाजपा, पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी भारताची वैचारिक मुख्यधारा, नागेश कोकरे यांनी व्यक्तीमत्व विकास, निलेश भंडारी यांनी आपला विचार व परिवार, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे यांनी राज्यतील राजकीय पार्श्वभूमी व भाजपा, ऍड. गजानन भाकरे यांनी पक्षाची कार्यपद्धती व भाजपा संघटनात्मक कार्य यावर आपले विचार मांडले. शहराध्यक्ष देशमुख यांनी भाजपा कार्यकर्ता व कर्तव्य यावर मत व्यक्त केले. शिबिराची प्रस्तावना भाजपाचे सरचिटणीस शशी थोरात यांनी केली. यावेळी मंडल अध्यक्ष महेश देवकर, भीमराव कुंभार, नगरसेविका अश्विनी चव्हाण, वरलक्ष्मी पुरुड, संगीता जाधव, राजश्रीताई पाटील, राजश्री चव्हाण, महिला आघाडीचे संपदा जोशी, खारे, गीता पाटोळे, बाळू गोणे आनंद गदगे , विशाल गायकवाड, मधुसूदन जंगम, बाबुराव गुघे, तसेच मंडलातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन परिवहनचे माजी सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी केले. आभार प्रदर्शन युवा मोर्चाचे प्रथमेश कोरे यांनी केले.