सोलापूर : भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे हे तरुण, उच्चशिक्षित आणि तडफदार नेतृत्व आहे. शहर मध्य विधानसभेच्या विकासासाठी नागरिकांनी ठरवल्याप्रमाणे यंदा शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. प्रभाग क्रमांक १८ मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सहभाग घेतला. यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि शहर मध्ये विधानसभेचे समन्वयक शिवानंद पाटील, माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागेंद्र नगर देवी मंदिर येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा यशवंत सोसायटी, श्रीराम नगर, पाटील नगर, शारदा विडी कारखाना, वेंकटेश्वर नगर, माधव नगर, तिमप्पा बंडा शाळा, माधव नगर हनुमान मंदिर, इंदिरानगर, ज्योती तरुण मंडळ, सत्तर फूट रस्ता चौक, महादेव मंदिर, शरण लिंगेश्वर मठ, सृजन मित्र मंडळ, गेंट्याल टॉकीज, सत्यसाई नगरमार्गे लोकसेवा शाळेजवळ विसर्जित झाली.
याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता श्रीनिवास करली, शहर चिटणीस सुनील गौडगाव, मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, धीरज कुंभार, शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी, नगरसेवक सुनील पाताळे, उपाध्यक्ष जय साळुंखे, जक्कप्पा कांबळे, पुरुषोत्तम पोबत्ती आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.