नवी दिल्ली : भाजपने त्यांचे संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समिती जाहीर केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळातून वगळण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे या संसदीय मंडळाचे आणि भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. सर्बानंद सोनोवाल आणि बी एस येडियुरप्पा यांचा भाजपच्या बोर्डात समावेश करण्यात आला आहे. संसदीय मंडळ ही भाजपची सर्वात शक्तिशाली संस्था मानली जाते. पक्षाचे सर्व मोठे निर्णय या मंडळाच्या माध्यमातून घेतले जातात.
भाजपच्या संसदीय मंडळाची संपूर्ण यादी
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
गृहमंत्री अमित शाह
बी. एस येडियुरप्पा
सर्बानंद सोनोवाल
के लक्ष्मण
इक्बाल सिंग लालपुरा
सुधा यादव
सत्यनारायण जातिया
बी एल संतोष (सचिव)
भाजपची केंद्रीय निवडणूक समिती
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
गृहमंत्री अमित शाह
बी. एस येडियुरप्पा
सर्बानंद सोनोवाल
के लक्ष्मण
इक्बाल सिंग लालपुरा
सुधा यादव
सत्यनारायण जातिया
भूपेंद्र यादव
देवेंद्र फडणवीस
ओम माथूर
बी.एल.संतोष (सचिव)
वनथी श्रीनिवास (पदसिद्ध)