राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षकसंघाच्या पाच जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. यात कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत पक्ष उमेदवार बाळाराम पाटील यांच्यात थेट लढत होत झाली. यात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळविला आहे.
कोकणात पदवीधर मतदारसंघात एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले होते. यात आता कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०, ८०० मतं मिळाली आहे. तर बाळाराम पाटील यांना ९ हजार ५०० मतं मिळाली.याठिकाणी गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदान झालंय. त्याचा फायदा म्हात्रे यांना झाल्याचा स्पष्ट झालं आहे.
कोकण शिक्षक मतमोजणीला सुरुवात झाली असून ज्ञानेश्वर म्हात्रे सध्यातरी आघाडीवर आहेत. एकूण त्यांच्याकडे सहा हजार मतांची आघाडी आहे. अवैध- वैद्य मत तपासणी सुरु आहे. पहिल्या पसंतीची मते पाहिली जात आहेत. प्रत्येक टेबलावरील मोजणीत 60 टक्के मतदान ज्ञानेश्वर म्हात्रे यांना तर 40 टक्के मतदान बाळाराम पाटील यांना झाल्याचे दिसत आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नेरुळमधील आगरी कोळी भवन या ठिकाणी ही मतमोजनी प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतपेट्या फोडून मतपत्रिका एकत्रित करुन यातील वैध्य आणि अवैध्य मतपत्रिका बाजूला काढण्यात आल्या. दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.