महाराष्ट्रात मराठी नववर्ष म्हणजे गुढी पाडव्याच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळत आहे. गुढी पाडवा आणि रमजान ईद हे दोन्ही उत्सव एकापाठोपाठ एक आल्याने हिंदू व मुस्लिम बांधव सणाच्या तयारीला लागले आहेत. सामाजिक सौहार्द व बंधुप्रेम जपत दोन्ही सण साजरे होत आहेत.
भाजपने 32 लाख मुस्लिम बांधवांना ईदनिमित्ताने ईदी भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सौगात ए मोदी’ नावाने भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाकडून 32 लाख मुस्लिम बांधवांना हे कीट देण्यात येणार आहेत. या कीटसंदर्भात बोलताना भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीनिमित्ताने हिंदू बांधवांना तर बडे दिननिमित्त ईसाई बांधवांना भेटवस्तू देतात. त्यामुळे, आता ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना ही भेट दिली जात असून मोदींवर सर्वच मुस्लिम बांधव प्रेम करतात, असेही गौतम यांनी म्हटले.
भाजपकडून देण्यात येणाऱ्या सौगात ए मोदी कीटमध्ये नेमकं काय असणार आहे. तर, या कीटमध्ये नवीन कपडे, शेवया, खजूर, काजू-बदाम आणि साखर असणार आहे. तर, महिलांना देण्यात येणाऱ्या कीटमध्ये सूटचे कापड असणार असून पुरुषांच्या कीटमध्ये कुर्ता-पायजमाचा कपडा असेल.