भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील कामाठी वय 44 यांच आज पहाटे 6:30 वाजता निधन झालं. अश्विनी रुग्णालयात गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते . रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर रुग्णालयातच हृदयविकाराचा झटका ही आला असे निकटवर्ती यांनी सांगितलं.
सुनील कामाठी वय 45 यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.खड्डा तालीम येथील मंडळाचे कार्यकर्ते तसेच कामाठी यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने अश्विनी रुग्णालयात जमले आहेत.