आमदार देवेंद्र कोठे यांचा पुढाकार : भाजपाचे सदस्यता महाअभियान
सोलापूर : भारतीय जनता पार्टी च्या संघटनपर्व अंतर्गत शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात रविवारी विक्रमी सदस्य नोंदणी करण्यात आली. ११ हजार ७३६ नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व घेतले.
संपूर्ण राज्यभरात भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्यता महाअभियान राबवण्यात येत आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपा सदस्य नोंदणीसाठी तब्बल ७० ठिकाणी सदस्य नोंदणी केंद्रे उघडण्यात आली होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ११ हजार ७३६ नागरिक भाजपाचे अधिकृत सदस्य बनले.
शहर मध्य विधानसभेत अधिकाधिक सदस्य नोंदणी व्हावी याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी पुढाकार घेत सदस्य नोंदणी केंद्र सुरू केली आहेत. रविवारी दिवसभर विविध भागातील सदस्य नोंदणी केंद्रांना भेटी देऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी सदस्य नोंदणीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, बूथ स्तरावरील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५० हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट करणार पूर्ण
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियानांतर्गत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून ५० हजार सदस्यता नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत घेत असून लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण होईल.