सोलापूर : ३ जानेवारी…. नववर्षातील पहिला रविवार…. यानिमित्ताने सायकल लव्हर्स ग्रुपकडून हिप्परगा तलाव राईड आयोजित केली होती. यामध्ये तब्बल 30 जणांनी सहभाग घेतला. सहभागी सायकलस्वारांनी बर्ड वॉचिंग करत निसर्गाचा आणि सायकलीचा आनंद लुटला.
सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौकातून या राईडचा शुभारंभ झाला. चार पुतळा-लकी चौक-छ्त्रपती शिवाजी चौक-संभाजी पुतळामार्गे हे सायकल स्वार सूर्योदयाच्या वेळी हिप्परगा तलाव येथे पोहोचले. याठिकाणी सुर्योदया बरोबरच उत्साही वातावरणात घोषणाबाजी करत फोटोसेशनची सायकलस्वारांनी मजा घेतली. यावेळी सायकल लवर्स ग्रुप कडून वर्षभरात करण्यात येणारे उपक्रम व स्पर्धांची माहिती देण्यात आली. फिटनेस आणि सायकलिंग मध्ये आवड असणाऱ्या व्यक्तींनी दर रविवारी होणाऱ्या संडे सायकलिग तसेच मासिक आणि वार्षिक चॅलेंज मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सायकल लवर्स ग्रुप कडून करण्यात आले. यानंतर हिप्परगा तलाव परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची पक्षीमित्र संतोष धाकपाडे यांनी ओळख करून दिली. हिप्परगा तलाव ते कारंबा पंपहाऊस मार्गे बाळे येथील बार्शी टोल नाका येथून ही सायकल राईड छत्रपती संभाजी पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आली. डॉक्टर प्रविण ननवरे महेश बिराजदार, आदित्य बालगावकर, भावेश शहा, आय.पी.सिंग, शिवाजी सुरवसे, चंद्रकांत दुधाळ बालाजी सुरवसे आदींनी या राईडचे योग्य नियोजन केले होते. या सायकल राईड मध्ये डॉक्टर ,इंजिनियर यासह अनेकजण सहभागी झाले होते.